ट्रॅक्टर उलटला: एक ठार; तीन जखमी
By Admin | Updated: April 22, 2017 01:19 IST2017-04-22T01:19:45+5:302017-04-22T01:19:45+5:30
शेगाव येथून मेहकर तालुक्यात धान्य वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली.

ट्रॅक्टर उलटला: एक ठार; तीन जखमी
बाळापूर : शेगाव येथून मेहकर तालुक्यात धान्य वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने एक जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली.
शेगाव येथून मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द येथे धान्य घेऊन जाणार्या ट्रॅक्टरची ट्रॉली पिवळ्या नाल्याजवळ उलटली. यामध्ये रामेश्वर दत्तू करे (४0), रा. मोहना मांडवा हे जागीच ठार झाले, तर जानकीराम मनुराम जाधव, सचिन सुभाष पवार, अनंता श्रावण विघ्ने आदी जखमी झाले. जखमींना तातडीने अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले. याप्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.