ट्रॅक्टर उलटला; २ ठार, ११ जखमी
By Admin | Updated: October 5, 2014 02:19 IST2014-10-05T02:19:30+5:302014-10-05T02:19:30+5:30
मुंडगावच्या भाविकांवर काळाचा घाला; पोपटखेड-खटकाली मार्गावरची घटना

ट्रॅक्टर उलटला; २ ठार, ११ जखमी
मुंडगाव (अकोला) : पोपटखेड धरणात दुर्गा विसर्जनानंतर परत येत असलेल्या मुंडगाव येथील भाविकांचा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर ११ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी घडली. जखमींवर अकोला येथील सवरेपचार व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंडगाव येथील सागर महिला नवदुर्गा मंडळाचे कार्यकर्ते देवीचे विसर्जन करण्याकरिता शुक्रवारी अनिल मधुकर निमकर्डे यांच्या ट्रॅक्टरद्वारे पोपटखेड धरणावर गेले होते. विसर्जन झाल्यानंतर सर्वजण ट्रॅक्टरनेच खटकाली येथे जेवण करण्यासाठी निघाले. पोपटखेड-खटकाली रस्त्यावर अंधा मोड, पीर बाबाचे दग्र्याजवळ मागचे चाक खड्डय़ात गेल्याने ट्रॉली उलटली. यात देवीदास काशीराम इंगळे व वासुदेव ओंकार आकोते यांचा मृत्यू झाला. पूनम देवसिंग खटोळ, हरिदास नामदेव काळे, कल्पना संजय खन्नाडे, प्रतीक संजय खन्नाडे, अंकुश प्रल्हाद ढोकणे, रोहित गजानन देवराय, अंकित आनंदराव खन्नाडे, शुभम घुले, श्रीकांत रवींद्र रेहनवाल, अर्चना खोले, वसंता खोले हे जखमी झाले. सुधाकर रामचंद्र मलिये यांनी आकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी ट्रॅक्टरचालक तुषार गजानन राऊत याचेविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ अ भादंवि, १८४ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली.