ट्रॅक्टरची दुचाकीस धडक; एक ठार

By Admin | Updated: June 3, 2017 01:33 IST2017-06-03T01:33:25+5:302017-06-03T01:33:25+5:30

अकोट: पोपटखेड मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली. सदर घटना १ जून रोजी रात्री १०.३० वाजता सुमारास घडली.

Tractor hits two-wheeler; One killed | ट्रॅक्टरची दुचाकीस धडक; एक ठार

ट्रॅक्टरची दुचाकीस धडक; एक ठार

अकोट: पोपटखेड मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली. सदर घटना १ जून रोजी रात्री १०.३० वाजता सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी पुंडलिक महादेव इखार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
केशव महादेव इखार यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, त्यांचे मोठे भाऊ पुंडलिक महादेव इखार रा. मोठे बारगण कुंभारवाडी हे एम. एच. ३० डब्ल्यू. ५३९९ या क्रमांकाच्या मोटारसायकलने घरी येत होते. त्यावेळी शिवाजी चौकाकडून येणाऱ्या नवीन विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या चालकाने धडक दिली. यामध्ये पुंडलिक इखार गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Tractor hits two-wheeler; One killed