ट्रॅक्सची दुचाकीस धडक; एक ठार
By Admin | Updated: April 26, 2017 02:06 IST2017-04-26T02:06:43+5:302017-04-26T02:06:43+5:30
पातूर : भरधाव ट्रॅक्सने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला. ही घटना पातूर-अकोला मार्गावरील शिर्ला गावाजवळ २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

ट्रॅक्सची दुचाकीस धडक; एक ठार
पातूर : भरधाव ट्रॅक्सने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला. ही घटना पातूर-अकोला मार्गावरील शिर्ला गावाजवळ २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
अकोला येथून पातूरकडे येत असलेली काळी-पिवळी ट्रॅक्स क्र. एमएच ३० ई ९६९९ ने शिर्ला येथील पेट्रोल पंपाजवळ दुचाकी क्र. एमएच २७ एजे ९५५९ ला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार चेतन लोखंडे रा. अंधारसांगवी हा जागीच झाला. घटनेची माहिती मिळताच एपीआय प्रकाश झोडगे, हे.काँ. सुनील चांदे, अमर इंगळे यांनी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.