शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मागोवा २०१७ : ‘स्वाइन फ्लू’च्या दहशतीत गेले वर्ष; वर्षभरात २९ बळी

By atul.jaiswal | Updated: December 30, 2017 14:15 IST

अकोला : गत वर्षभरात डेंग्यू, मलेरिया या कीटकजन्य आजारांनी तोंड वर काढले नसले, तरी स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराने मात्र अकोलेकरांना चांगलेच हैराण करून सोडले.

ठळक मुद्देजिल्ह्यात मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता.जानेवारी ते डिसेंबर २०१७ या काळात जिल्ह्यात एकूण २५० जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली.१२५ जण या आजारासाठी पॉझिटिव्ह आढळून आले, तर १२५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली.

- अतुल जयस्वालअकोला : गत वर्षभरात डेंग्यू, मलेरिया या कीटकजन्य आजारांनी तोंड वर काढले नसले, तरी स्वाइन फ्लू या विषाणूजन्य आजाराने मात्र अकोलेकरांना चांगलेच हैराण करून सोडले. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराने शहर व ग्रामीण भागात पाय पसरून अनेक जणांना आपल्या कवेत घेतले. जानेवारी ते डिसेंबर २०१७ या काळात जिल्ह्यात एकूण २५० जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यापैकी १२५ जण या आजारासाठी पॉझिटिव्ह आढळून आले, तर १२५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. यापैकी २९ जण दगावले. त्यामुळे एकंदरीत हे वर्ष ‘स्वाइन फ्लू’च्या दहशतीतच गेले.संपूर्ण राज्यात थैमान घालणाºया स्वाइन फ्लूने गतवर्षी शहरात शिरकाव केला. एच १ एन १ या विषाणूंमुळे होणारा हा आजार अत्यंत संसर्गजन्य असून, एका रुग्णापासून दुसºयापर्यंत हवेच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होतो. जिल्ह्यात मार्च महिन्यात स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर या आजाराने संपूर्ण जिल्ह्यात पाय पसरविले. उन्हाळ्यात तापमान ४५ अंश सेल्सियसवर गेल्यानंतरही स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा ओघ सुरूच राहिला. पावसाळ्यात तर स्वाइन फ्लूने चांगलेच डोके वर काढले. जून व जुलै महिन्यात अनेक जणांना या आजाराची लागण झाली. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत एकूण २९ जण या आजारामुळे दगावले. स्वाइन फ्लूला अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने खूप प्रयत्न केले; परंतु त्यात फारसे यश आले नाही. शासकीय रुग्णालयांमधील आकडा समोर आला असला, तरी खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्यांची किंवा दगावल्याची आकडेवारी समोर येऊ शकली नाही.‘सर्वोपचार’च्या समस्या कायमच!अकोला व लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांसाठी आधार असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येणाºयांची संख्या दरवर्षी वाढत असली, तरी रुग्णालयातील मूलभूत सुविधांचा अभाव व समस्या गतवर्षीही कायम राहिल्या. अस्वच्छता, मनुष्यबळाची कमतरता यामुळे रुग्णालयात येणाºया रुग्णांची हेळसांड गतवर्षीही कायमच राहिली.स्त्री रुग्णालयातील बालमृत्यूने वेधले लक्षपूर्वाश्रमीचे लेडी हार्डिंग व जिल्हा स्त्री रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता विभाग (एसएनसीयू)मधील बालकांच्या वाढत्या मृत्यूदराने मानवाधिकार आयोगाचे लक्ष वेधले. येथील ‘एसएनसीयू’मध्ये एका वर्षात ४५१ बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती.‘एमआरआय’चे भिजत घोंगडेसर्वोपचार रुग्णालयात एमआरआय मशीन बसविण्यासाठी मुंबई येथील सिद्धिविनायक ट्रस्टने पाच कोटी रुपये देऊ केले असले, तरी शासन हिश्श्याची रक्कम व पद निर्मिती न झाल्यामुळे येथे एमआरआय मशीन कार्यान्वित होऊ शकली नाही.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय