दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला
By नितिन गव्हाळे | Updated: May 28, 2023 19:23 IST2023-05-28T19:22:50+5:302023-05-28T19:23:06+5:30
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अंतर्गत नो पार्किंग झोनमधील वाहने उचलणाऱ्या टोइंग पथकातील एका मजुराने दुचाकी उचलल्याच्या रागातून दोघा जणांनी त्याला मारहाण करून चाकू मारून जखमी केले.

दुचाकी उचलल्याच्या रागातून टोइंग पथकातील मजुरावर चाकूने हल्ला
अकोला : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अंतर्गत नो पार्किंग झोनमधील वाहने उचलणाऱ्या टोइंग पथकातील एका मजुराने दुचाकी उचलल्याच्या रागातून दोघा जणांनी त्याला मारहाण करून चाकू मारून जखमी केले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सागर उपरीकर (२८) रा. चिवचिव बाजार याच्या तक्रारीनुसार तो शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अंतर्गत शहरात नो पार्किंगमध्ये उभे राहणाऱ्या वाहनांना उचलणाऱ्या टोइंग पथकामध्ये मजूर म्हणून काम करतो.
२५ मे रोजी रात्री कामावरून घरी आल्यानंतर तो चौकात मित्रांसोबत बसलेला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास ऑटोतून उतरलेल्या कुणाल देशमुख व रवी नामक युवकाने अचानक जवळ येऊन दुचाकी कशी उचलली, यावरून वाद घालून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि हातावर चाकू मारून जखमी केले. जखमी अवस्थेतच सागर उपरीकर हा सिटी काेतवाली पोलिसांत धावत गेला आणि त्याने तक्रार नोंदवली.