अत्याचार करणा-या पित्याला कोठडी

By Admin | Updated: November 4, 2016 02:28 IST2016-11-04T02:28:39+5:302016-11-04T02:28:39+5:30

११ वर्षीय मुलीवर बलात्कार; पित्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी.

Torture father | अत्याचार करणा-या पित्याला कोठडी

अत्याचार करणा-या पित्याला कोठडी

अकोला, दि. ३- वस्तापूर-झोडगा शिवारात जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर बलात्कार करून नात्याला काळिमा फासल्याची घटना १ नोव्हेंबरच्या रात्री घडली. पोलिसांनी पित्याला गजाआड करून त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पित्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास नराधम पित्याने नात्याचा कोणताही विचार न करता, पोटच्या ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. पीडीत मुलीने रात्रीच मोबाइलनवरून आईला झालेला प्रकार सांगितला आणि मुलीच्या आईने पित्याविरुद्ध पिंजर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला रात्रीच अटक केली.

Web Title: Torture father