उद्या मतमोजणी; यंत्रणा सज्ज

By Admin | Updated: October 18, 2014 00:53 IST2014-10-18T00:53:40+5:302014-10-18T00:53:40+5:30

अकोला जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांची मतमोजणीसाठी २२५ मतगणना कर्मचा-यांची नियुक्ती.

Tomorrow counting; Machinery ready | उद्या मतमोजणी; यंत्रणा सज्ज

उद्या मतमोजणी; यंत्रणा सज्ज

अकोला : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांची मतमोजणी ७५ टेबलवर होणार असून, त्यासाठी २२५ मतगणना कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतगणना पर्यवेक्षक, मतगणना सहाय्यक व सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ातील आकोट, बाळापूर, अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघातील १ हजार ४८0 मतदान केंद्रांवर बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत पाचही मतदारसंघातील ९३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. त्यामध्ये आकोट मतदारसंघाची मतमोजणी आकोट येथील पोपटखेड रोडवरील आयटीआय येथे, बाळापूर मतदारसंघाची मतमोजणी बाळापूर येथील शासकीय गोदाम येथे,अकोला पश्‍चिम व अकोला पूर्व या दोन मतदारसंघाची मतमोजणी अकोल्यातील खदानस्थित शासकीय धान्य गोदाम येथे आणि मूर्तिजापूर मतदारसंघाची मतमोजणी मूर्तिजापूर येथील शासकीय गोदाम येथे होणार आहे. प्रत्येक मतदारसंघाची मतमोजणी १५ टेबलवर होणार आहे, त्यामध्ये १४ टेबलवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी होणार असून, एका टेबलवर पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे. त्यानुसार जिल्हय़ातील पाचही मतदारसंघांची मतमोजणी एकूण ७५ टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर एक मतगणना पर्यवेक्षक, एक मतगणना सहाय्यक व एक सूक्ष्म निरीक्षक असे तीन कर्मचारी राहणार आहेत. त्यानुसार पाचही मतदारसंघात ७५ टेबलवर होणार्‍या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून एकूण २२५ मतगणना कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Tomorrow counting; Machinery ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.