अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आज मतदान
By Admin | Updated: May 5, 2015 01:24 IST2015-05-05T01:24:31+5:302015-05-05T01:24:31+5:30
जिल्हा मध्यवर्ती उर्वरित जागांसाठी अकोला व वाशिम जिल्हय़ातील पाच तालुक्यात मतदान.

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आज मतदान
अकोला : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या उर्वरित जागांसाठी मंगळवार, ५ मे रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत अकोला व वाशिम जिल्हय़ातील पाच तालुक्यात मतदान होऊ घातले आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विस्तार अकोला व वाशिम जिल्हय़ात आहे. एकूण २१ संचालकपदासाठी मतदान होणार होते. मात्र, या निवडणुकीत अगोदरच ११ संचालक अविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १0 जागांसाठी हे मतदान होणार आहे. अकोला, मुर्तिजापूर, बाळापूर, पातूर, रिसोड, मंगरूळपीर या मतदारसंघात सेवा सहकारीच्या जागा अविरोध झाल्या आहेत तर याच मतदारसंघात पगारदारसाठी मतदान होणार आहे. उर्वरीत तेरा तालुक्यात सेवा सहकारी व पगारदारसाठी मतदान होणार आहे. याकरिता विरोधी आणि विद्यमान संचालकांनी ताकद लावली आहे. बँकेच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सत्ता परिवर्तन होते की तेच संचालक कायम राहतात, यावर चर्चेच्या फैरी झडत आहे.