शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची आज मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 2:24 AM

अकोला : सोमवार, १९ फे ब्रुवारी रोजी होणार्‍या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृतीसाठी रविवारी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती शनिवारी मराठा सेवा संघ कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली.

ठळक मुद्देसोमवारी भव्य मिरवणूक, पोवाडे व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोमवार, १९ फे ब्रुवारी रोजी होणार्‍या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृतीसाठी रविवारी शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे, अशी माहिती शनिवारी मराठा सेवा संघ कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी दिली. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, सचिव अविनाश नाकट, डॉ. अभय पाटील, जगदीश मुरूमकार, संग्राम गावंडे, युवराज गावंडे, संदीप पाटील, राजेंद्र पातोडे, मनोज तायडे, सुषमा निचळ, मंदा देशमुख, प्रकाश तायडे, कपिल रावदेव, प्रदीप वखारिया, अशोक पटोकार, पंकज साबळे, पंकज जायले, अविनाश देशमुख व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्कमधील आणि श्री शिवाजी महाविद्यालयातील छत्रपतींच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी गत महिनाभरापासून विविध समित्या परिश्रम घेत आहेत. शिवजयंतीमध्ये विविध जाती, धर्म, पंथ, पक्ष आणि सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न समिती करीत आहे. अकोल्यातील शिवजयंती के वळ उत्सव न राहता ती प्रबोधनात्मक करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असल्याचे याप्रसंगी पदाधिकार्‍यांनी सांगितले.

मिरवणूक मार्गात बदल दरवर्षी शिवजयंती मिरवणूक टिळक मार्गे जाते; मात्र यंदा या मार्गाचे बांधकाम सुरू असल्याने उत्सव समितीने मार्गात बदल केला आहे. दुपारी ३ वाजता ही मिरवणूक शिवाजी पार्क येथून अकोट स्टँड, दामले चौक, अग्रसेन चौक, टॉवर चौक, धिंग्रा चौक मार्गे प्रमिलाताई ओक सभागृहासमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात पोहोचेल. येथे मिरवणुकीचे रूपांतरण जाहीर सभेत होणार आहे. औरंगाबाद येथील शाहिरांचे पोवाडे येथे होणार असून, सायंकाळी ७ वाजता इतिहास अभ्यासक डॉ. बालाजी जाधव यांचे व्याख्यान होणार आहे.

मिरवणुकीतील  विशेष आकर्षणशिवजयंतीनिमित्त सोमवारी निघणार्‍या मिरवणुकीत भजनी मंडळे, व्यायामशाळा, विविध देखावे, छत्रपती आणि जिजाऊंची वेशभूषा केलेले कलावंत, दिंड्या, ढोल-ताशे, पथक, प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. जिजाऊंच्या भूमिकेत नामांकित अभिनेत्री अकोल्यात येणार असल्याची माहितीही येथे देण्यात आली.

जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅलीशिवजयंतीमध्ये सर्व धर्मीयांचा सहभाग नोंदविण्यासाठी रविवार, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १0 वाजता जिल्हा परिषद कर्मचारी भवनापासून भव्य मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAkola cityअकोला शहर