अकोला महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा

By Admin | Updated: March 21, 2016 01:58 IST2016-03-21T01:58:53+5:302016-03-21T01:58:53+5:30

गोरक्षण रोडच्या कामासह पाणीपुरवठय़ाच्या विषयावर होणार चर्चा.

Today's General Meeting of Akola Municipal Corporation | अकोला महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा

अकोला महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा

अकोला : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार, २१ मार्च रोजी सकाळी ११.३0 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत नेहरू पार्क ते संत तुकाराम चौकापर्यंंंत गोरक्षण रोडवरील विद्युत खांब काढण्यासोबतच अमृत योजनेंतर्गत अतिरिक्त जलपुरवठा योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पीएमसी नियुक्त करण्याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र शासनाच्या अमृत योजनेत अकोला महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापनाबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम मजीप्राकडे देण्यात येणार आहे. या विषयावर मनपाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय गोरक्षण रोडच्या कामात अडथळा येत असलेले विद्युत खांब हटविण्याकरिता १ कोटी ६९ लाख ९८ हजार ६२३ रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चावर चर्चा करून सभेत खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला जाईल. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे स्थानिक प्राधिकारी संस्थेचा प्रतिनिधी पाठविण्याबाबत सभेत चर्चा करण्यात येणार असून, इतर विषयही सभेपुढे मांडले जातील.

Web Title: Today's General Meeting of Akola Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.