आज नूतन शालिवाहन शक वर्षाचा प्रारंभ!

By Admin | Updated: March 28, 2017 01:49 IST2017-03-28T01:49:10+5:302017-03-28T01:49:10+5:30

खगोलप्रेमी छायाचित्रकारांनाही पर्वणी असणार आहे.

Today is the beginning of the new Shalivahan Sakya Sakiya! | आज नूतन शालिवाहन शक वर्षाचा प्रारंभ!

आज नूतन शालिवाहन शक वर्षाचा प्रारंभ!

अकोला, दि. २७- मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी श्री शालिवाहन शके १९३९ हेमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत असून हे नूतन वर्ष शनिवार १७ मार्च २0१८ रोजी समाप्त होणार आहे आणि पुढच्या वर्षी गुढीपाडवा दहा दिवस अगोदर १८ मार्च २0१८ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते तथा खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांच्या पंचागात नमूद आहे. या नूतन शालिवाहन शकवर्ष १९३९ मध्ये दोन चंद्रग्रहणे व दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी सोमवार ७ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तसेच बुधवार ३१ जानेवारी २0१८ रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. त्या वेळी खग्रास स्थितीमध्येच चंद्र उगवताना दिसणार आहे. खगोलप्रेमी छायाचित्रकारांनाही ती एक पर्वणी असणार आहे. २१ ऑगस्ट २0१७ आणि १५ फेब्रुवारी २0१८ रोजी होणारी सूर्यग्रहणे मात्र भारतातून दिसणार नाहीत. या नूतन शक वर्षात १३ जून आणि ७ नोव्हेंबर अशा दोन अंगारकी चतुर्थी होणार आहेत. सुवर्ण खरेदी करणार्‍यांसाठी ९ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबर असे दोन गुरुपुष्ययोग असणार आहेत. या नूतन वर्षी १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात गुरू ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्याने दिसू शकणार नाही. तेजस्वी शुक्र ग्रह १६ डिसेंबर २0१७ ते १ फेब्रुवारी २0१८ सूर्यतेजात लुप्त झाल्याने आपणास दिसू शकणार नाही. प्राचीन पद्धतीप्रमाणे सर्व पंचांगात पर्जन्य अंदाज दिलेले असतात. नूतन वर्षी पाऊस चांगला पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या नूतन वर्षी सर्व सण-उत्सव मागील वर्षापेक्षा १0-११ दिवस अगोदर येणार आहेत, असे सोमण यांनी नमूद केले आहे. नवीन वर्षात चांगला पाऊस तेजस्वी शुक्र ग्रह १६ डिसेंबर २0१७ ते १ फेब्रुवारी २0१८ सूर्यतेजात लुप्त झाल्याने आपणास दिसू शकणार नाही. प्राचीन पद्धतीप्रमाणे सर्व पंचांगात पर्जन्य अंदाज दिलेले असतात. नूतन वर्षी पाऊस चांगला पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आहे.

Web Title: Today is the beginning of the new Shalivahan Sakya Sakiya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.