तंबाखू विक्री करणारे रडारवर !
By Admin | Updated: March 9, 2015 02:03 IST2015-03-09T02:03:15+5:302015-03-09T02:03:15+5:30
शैक्षणिक संस्थाच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा शासनाचा निर्णय.

तंबाखू विक्री करणारे रडारवर !
खामगाव (जि. बुलडाणा): शैक्षणिक संस्थाच्या आवारात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांंच्या विक्री बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने शनिवार ७ मार्च रोजी घेतला आहे. या निर्णयान्वये शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखू विक्री करणार्यांवर कार्यवाही करण्यात येणार असून, तंबाखू पदार्थांंच्या सेवनाच्या दुष्परिणामाबाबत व्यापक जनजागृती करण्याचाही संकल्प राज्य शासनाचा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये समाजात व्यसनांचे प्रमाण वाढीस लागल्याचे निर्दशनास आल्यानंतर राज्य शासनाच्यावतीने गुटखा आणि तत्सम पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. तथापि, शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांंच्या विक्रीमुळे विद्या र्थ्यांंना शालेय दशेपासून तंबाखू आणि इतर पदार्थांंचे व्यसन जडत असल्याचे निर्दशनास आले आहे. दरम्यान, शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांंच्या विक्रीबाबत राज्य शासनाच्यावतीने मनाई करण्यात आली असून, शैक्षणिक संस्थांपासून १00 मीटर परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांंची विक्री केल्यास २00 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंना तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणामही माहीत करून देण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच युवा पिढीला व्यसनांपासून परावृत्त करण्याकरिता जनजागृती शासनाकडून निर्माण करण्यात येणार आहे.