शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्त अभियान : अकोला जिल्ह्यातील ९९५ शाळा परिसराची पोलिसांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 15:30 IST

अकोला - शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात १५ दिवस मोहीम राबविली असून, पोलिसांनी तब्बल ९९५ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती केली.

ठळक मुद्देसंपूर्ण शैक्षणिक संस्थेचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यात राबवल्या जात आहे. तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा (कोटपा)ची माहिती देण्यासाठी १० ते २४ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभर विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलिसांनी जिल्ह्यात १५ दिवस मोहीम राबविली असून, पोलिसांनी तब्बल ९९५ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती केली.

अकोला - शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात १५ दिवस मोहीम राबविली असून, पोलिसांनी तब्बल ९९५ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थांमध्ये जनजागृती केली. तसेच १०० मीटर परिसरातील दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाºया २२९ दुकानदार व पानटपरीचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.संपूर्ण शैक्षणिक संस्थेचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान राज्यात राबवल्या जात आहे. या अभियानाची काटेकोर अंमलबजावणी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा (कोटपा)ची माहिती देण्यासाठी १० ते २४ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाभर विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजचा परिसर तंबाखूमुक्त करण्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांना भेटी देण्यात आल्या. संस्था परिसरात धूम्रपान निषेध बोर्ड लावणेबाबत सूचित करण्यात आले. त्यानंतरही परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात आली, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले. १५ दिवसांत पोलिसांकडून ९९५ शाळा, कॉलेजांना भेटी देऊन विद्यार्थांच्या जीवनावर तंबाखूचा परिणाम होऊ नये, यासाठी दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून त्यांना कोटपा कायद्याची माहिती देण्यात आली. पास्को कायदा, सोशल मीडियाचा योग्य वापर, वाहतुकीचे नियम पालन, येणारी पोलीस भरती, स्पर्धा परीक्षेची माहिती देण्यात आली व विद्यार्थांमधून १५१ नवीन पोलीस मित्रांची नोंदणी करण्यात आली.

या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रभावी मोहीमशहरातील सिटी कोतवाली, सिव्हिल लाइन्स, खदान, अकोट ग्रामीण, अकोट फैल व एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रभावीपणे मोहीम राबवण्यात आली. या परिसरात तंबाखूमुक्त अभियान ताकदीने राबविण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाPoliceपोलिस