टिपटाळा येथे चिमुकलीवर अत्याचार

By Admin | Updated: April 9, 2017 01:33 IST2017-04-09T01:33:55+5:302017-04-09T01:33:55+5:30

नऊ वर्षीय चिमुकलीवर १७ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी घडली.

At Tiptala, atrocities on the Chimukulla | टिपटाळा येथे चिमुकलीवर अत्याचार

टिपटाळा येथे चिमुकलीवर अत्याचार

मूर्तिजापूर : तालुक्यातील टिपटाळा येथे नऊ वर्षीय चिमुकलीवर १७ वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी घडली. याप्रकरणी आरोपी युवकाविरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तालुक्यातील टिपटाळा येथील नऊ वर्षीय बालिका शेजारी राहणार्‍या आपल्या मैत्रिणीकडे खेळायला गेली होती. यावेळी मैत्रिणीच्या भावाने त्या चिमुकलीवर अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी युवकाविरुद्घ कलम ३७६, पास्को ४ अंतर्गत कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी युवकास ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Web Title: At Tiptala, atrocities on the Chimukulla