लॉकडाऊनमुळे वाजंत्री, वादकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:33+5:302021-03-26T04:18:33+5:30

व्होल्टेज कमी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी चिखलगाव : चिखलगाव येथे अनेक दिवसांपासून विजेच्या व्होल्टेजची समस्या असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन ...

Time of starvation on instruments, musicians due to lockdown | लॉकडाऊनमुळे वाजंत्री, वादकांवर उपासमारीची वेळ

लॉकडाऊनमुळे वाजंत्री, वादकांवर उपासमारीची वेळ

व्होल्टेज कमी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

चिखलगाव : चिखलगाव येथे अनेक दिवसांपासून विजेच्या व्होल्टेजची समस्या असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना वीज बिल भरण्यास महावितरणचे कर्मचारी सक्ती करीत आहेत. अनेक लोकांच्या बोअरवेल, घरातील वीज, पंखा व महा ई सेवा केंद्रामध्ये कमी व्होल्टेजमुळे त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.

अनिल राणे यांची निवड

आगर : आगर येथील रहिवासी अनिल राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी झाली आहे. महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कोल्हापूर विभाग सचिव म्हणून ते काम करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे त्यांनी दहा वर्षे सचिवपद भूषविले.

कालवाडी येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सव

अकोट : तालुक्यातील कालवाडी येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सवाला प्रारंभ झाला असून, तुकाराम गाथेवर ह. भ. प. मोहन महाराज वडाळीकर मार्गदर्शन करीत आहेत. कोरोनामुळे उत्सव मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी तीर्थस्थापना, वीणा व गाथापूजन अनंत महाराज यांनी सपत्निक केले.

अजय ठाकूरची राष्ट्रीय कबड्डी संघात निवड

तेल्हारा : तेलंगणा येथे होणाऱ्या ४७ व्या राष्ट्रीय ज्युनिअर कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भ संघात तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील जय हनुमान मंडळाचा खेळाडू अजय संतोषसिंह ठाकूर याची निवड झाली आहे. त्याची निवड झाल्याबद्दल जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव गावंडे, वासुदेवराव नेरकर, बंडू खुमकर, राजकुमार बुले, गजानन देशमुख, श्रीकृष्ण खुमकर यांनी कौतुक केले.

क्षयरोग दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रम

बार्शी टाकळी : क्षयरोग दिनानिमित्त मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. धम्मदीप भगत होते. रुग्ण कल्याण समिती सदस्य मो. सादिक, शाहिद इकबाल खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अरुण बांगर, अरविंद पारसकर, औषधनिर्माण अधिकारी शर्मा, आरोग्यसेवक राम बायस्कर, अमोल पाचळे, डॉ. सिराज खान उपस्थित होते.

जेसीआय अकोटतर्फे कोविड लस ऑनलाईन नोंदणी

अकोट : जेसीआय अकोटच्या वतीने कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचे उद्घाटन अध्यक्ष नितीन शेगोकार, पवन ठाकूर, उपाध्यक्ष नीलेश इंगळे, अजय अडोकार, सचिव सागर बोरोडे यांनी केले. नागरिकांनी सेतू केंद्र कृषी विद्यालयासमोर मोबाईल व आधार कार्ड घेऊन नोंदणी करावी.

पातूर येथे पशुवैद्यकीय दवाखाना बंद

पातूर : पातूर शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्यामुळे पशुपालकांची गैरसाेय होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये गुरांना नेऊन पशुपालकांना उपचार करावे लागत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे.

मूर्तिजापुरात एक दिवस पशुपक्ष्यांसाठी

मूर्तिजापूर : शहरात ग्रामस्वच्छता अभियानाच्या वतीने ‘एक दिवस पशुपक्ष्यांसाठी’ उपक्रम सुरू केला आहे. पक्ष्यांसाठी पाणेरी सुरू केली आहे. यावेळी अभियानाचे पदाधिकारी प्राचार्य सत्यनारायण तिवारी, विलास नसले, रोहित सोळंके, प्रा. एल. डी. सरोदे, दिनेश श्रीवास, अमोल तातुरकर, विलास वानखडे उपस्थित होते.

अवैध दारू विक्रीची तक्रार

खंडाळा : हिवरखेड पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या खंडाळा गावात बिट जमादाराच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्या वर्षा वाघोडे यांनी पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कृष्णा सोळंके याची नवोदयसाठी निवड

हिवरखेड : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालठाणाच्या विद्यार्थी कृष्णा मोहन सोळंके याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. त्याला मुख्याध्यापक अरुण निमकर्डे, शिक्षक उमेश नेरकर, केंद्रप्रमुख दीपक दही, शाळा व्यवस्थापन समितीचे शैलेशसिंह गहेरवार, उमेश पवार, डॉ. पंजाबराव धामोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोरोनाचा प्रादुर्भाव, नागरिक बेफिकीर

बोरगाव मंजू : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना, बोरगाव येथील नागरिक मात्र, बेफिकिरीने वावरत आहेत. विनामास्क, फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी

पिंजर : पिंजर परिसरात झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे हरभरा, गहू, कांदा व फळबागांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Time of starvation on instruments, musicians due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.