टाइल्स कंपनीच्या कर्मचा-यास मारहाण करून तीन लाख लुटले

By Admin | Updated: October 24, 2015 01:40 IST2015-10-24T01:40:46+5:302015-10-24T01:40:46+5:30

बोरगाव मंजू जवळील घटना; गुन्हा दाखल.

Tiles hit the employees of the company and plundered three lakhs | टाइल्स कंपनीच्या कर्मचा-यास मारहाण करून तीन लाख लुटले

टाइल्स कंपनीच्या कर्मचा-यास मारहाण करून तीन लाख लुटले

बोरगाव मंजू (जि. अकोला): अकोला येथील एका टाइल्स तयार करणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यास मारहाण करून तीन लाख रुपये लुटल्याची घटना गुरुवारी दुपारी अंबिकापूरजवळ घडली. हरीश गजानन कराळे (वय २५, रा कुंभारी) हे अकोला येथील एका टाइल्स तयार करण्याच्या कंपनीत कार्यरत आहेत. ते दर्यापूर येथे दुकानदाराकडे कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी एमएच-३0-डब्ल्यू-१८६८ या क्रमांकाच्या दुचाकीने गेले. दुपारी ते तीन लाख रुपये घेऊन अकोल्याकडे परत येत असताना अंबिकापूरजवळ तीन अज्ञात इसमांनी त्यांना पाठलाग करून अडविले. त्यांनी कराळे यांना मारहाण करून तीन लाख रुपये घेऊन पलायन केले. या मारहाणीत बेशुद्ध झालेले कराळे काही प्रवाशांना दिले. त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रथम त्यांचा अपघात झाल्याचा अंदाज होता. मात्र शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितले. त्यावरून बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपींविरुद्ध ३९४ (मारहाण करून लुटणे), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Tiles hit the employees of the company and plundered three lakhs