कागदावर अवतरले वाघ, अस्वल !

By Admin | Updated: October 3, 2014 01:21 IST2014-10-03T01:21:21+5:302014-10-03T01:21:21+5:30

वन सप्ताहानिमित्त अकोला येथे चित्रकला स्पर्धा.

The tiger on the paper, the bear! | कागदावर अवतरले वाघ, अस्वल !

कागदावर अवतरले वाघ, अस्वल !

अकोला : गुहेतून निघालेला वाघ, हरणांची शिकार करणारे वाघ, सहद खाणारी अस्वल अशाप्रकारे विविध प्राणी गुरुवारी सकाळी शहरातील नेहरू पार्कमध्ये कागदावर अवतरले. वन विभागाच्याव तीने ह्यजंगलातील वन्य प्राणी व पर्यावरणह्ण या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
वन विभागाच्या वन सप्ताहानिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. २ ऑक्टोबर रोजी नेहरू पार्कमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वन्य जीव विभागाचे उप वनसंरक्षक विजय गोडबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी पुयाळ, व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, छायाचित्रकार संजय आगाशे, देवेंद्र तेलकर यांच्यासह वन विभागातील अधिकार्‍यांची उपस्थिती हो ती. चित्रकला स्पर्धेत एक ते चार वर्ग गटात पहिला क्रमांक खंडेलवाल इंग्लिश स्कूलची इशा राजेश उंटा हिला तर द्वितीय क्रमांक खंडेलवाल इंग्लिश स्कूलची श्रेया विजय ढगे, तिसरा क्रमांक हिंदू ज्ञान पीठ इंग्लिश स्कूलची प्रचिती प्रल्हाद नेमाडे हिला मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस बाल शिवाजी माध्यमिक शाळेचा प्रसाद गुडेवार याला मिळाले. वर्ग पाच ते सातमधील गटामध्ये ज्योती जानोरकर विद्यालयाची भाग्यश्री शिरेकर हिला पहिला क्रमांक मिळाला तर द्वितीय खंडेलवाल ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूलची श्रुतिका कदम, तिसरा क्रमांक भक्ती उमरकर हिला मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस दर्शना भाकरे हिला मिळाले. वर्ग ८ ते १0 गटात मयूरेश खुपसे, आदर्श पाटकर, तुषार वानखडे यांना अनुक्रमे प्र थम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ बक्षीस अंकुश पदमने यांना मिळाले.

Web Title: The tiger on the paper, the bear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.