लोकमत न्यूज नेटवर्कमहान : तोंडाला रूमाल बांधून एस. टी. बसवर दगड मारून काचा फोडल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नजिकच्या बिहाडमाथा फाट्यावर घडली.अकोलावरून दिग्रसकडे जाणारी एमएच ४0 एन ९१४५ क्रमांकाच्या एसटी बसमध्ये एकूण ६0 प्रवासी प्रवास करीत होते. बिहाडमाथा फाट्यासमोरून तीन तरुण दुचाकीने येत होते. तोंडाला रूमाल बांधलेल्या त्या युवकांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. एसटी बसला जवळ येऊ दिले. त्यानंतर दुचाकीवरील मागच्या तिसर्या क्रमांकाच्या तरुणाने बसच्या समोरील काचेवर दगड मारला व ते पसार झाले. चालक नारायण राठोड व वाहक पी. बी. ढाकोलकर यांनी समोरून येणार्या एका दुचाकीस्वाराला पाठलाग करण्यासाठी गाडी मागितली. वाहक व चालक यांनी दगडपारवापर्यंत त्या तरुणांचा पाठलाग केला; परंतु ते तिन्ही अनोळखी तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरले. एसटी बसमध्ये गर्दी असल्याने चालकाच्या बाजूला इंजिन बोनेटवर एक प्रवासी बसला होता. त्याच दिशेने अनोळखी तरुणाने दगड मारल्याने त्या प्रवाशाच्या कपाळावर दुखापत झाली. यानंतर बसमधील घाबरलेल्या सर्व प्रवाशांना दुसर्या बसमध्ये बसविण्यात आले. चालक नारायण राठोड यांनी घटनेची तक्रार बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये दिली.
तोंडाला रूमाल बांधून एस.टी. बसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 01:04 IST
महान : तोंडाला रूमाल बांधून एस. टी. बसवर दगड मारून काचा फोडल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास नजिकच्या बिहाडमाथा फाट्यावर घडली.
तोंडाला रूमाल बांधून एस.टी. बसवर दगडफेक
ठळक मुद्देबसची काच फोडली एक प्रवासी जखमी