कार चोरीप्रकरणी आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By Admin | Updated: October 17, 2014 01:18 IST2014-10-17T01:15:34+5:302014-10-17T01:18:10+5:30

आकोट येथील कार चोरीप्रकरण.

Three years' rigorous imprisonment for car robbery | कार चोरीप्रकरणी आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

कार चोरीप्रकरणी आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

आकोट (अकोला) : गुंगीचे औषध देऊन कार चोरी करून तिची विल्हेवाट लावणार्‍या आरोपी आशीष रायबोले याला आकोट येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीसह विविध कलमांन्वये शिक्षा सुनावली आहे. २४ ऑक्टोबर २0१0 रोजी श्रीराम निवास लॉज आकोट येथे फिर्यादी अजय मनोहर जाधव याला चहामध्ये गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर त्याच्याजवळील एमएच ४३ आर २२८३ या क्रमांकाची १ लाख १0 हजार रुपये किमतीची मारुती ओमनी कार चोरून नेण्या त आली. या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपी आशीष रायबोलेविरुद्ध भादंवि ३२८, ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या त पासादरम्यान आरोपी आशीष वासुदेव रायबोले यास सहआरोपी विकास विजय शेवणेसह ओमनी कारची विल्हेवाट लावताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरो पीला अटक केली होती. सदर प्रकरणी आरोपीविरुद्धचे दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. सरकार पक्षाने दिलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सु. वा. चव्हाण यांनी आरोपी आशीष रायबोले याला कलम ३२८ मध्ये ३ वर्ष सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा, कलम ३७९ मध्ये ३ वर्ष शिक्षा व दंड १ हजार रुपये, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकाचवेळी आरो पीला भोगावयाच्या आहेत, तर दुसर्‍या आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील एस. आर. राहाणे, तर आरोपीतर्फे अँड. काझी यांनी काम पाहिले.

Web Title: Three years' rigorous imprisonment for car robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.