मॉर्निंग वॉकला जाणा-या तीन महिलांचे दागिने पळविले
By Admin | Updated: May 18, 2015 01:25 IST2015-05-18T01:25:30+5:302015-05-18T01:25:30+5:30
चाकूचा दाखविला धाक; चोरट्यांचा उच्छाद.

मॉर्निंग वॉकला जाणा-या तीन महिलांचे दागिने पळविले
अकोला - शिवणी येथील तीन महिला रविवारी सकाळी मॉर्निंंग वॉकला जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिने पळविल्याची घटना घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु क ेला आहे. शिवणी येथील रहिवासी कमलाबाई जगताप, जीवनाबाई नृपनारायण व त्यांच्यासोबत असलेली आणखी एक वृद्धा रविवारी सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे मॉर्निंंग वॉकला जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी तीनही महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले. चाकूचा धाक दाखवून या तीनही महिलांकडील सोन्याचे दागिने घेऊन अज्ञात चोरटे अकोला शहराच्या दिशेने फरार झाले. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.