भरधाव बसचे तीन टायर फुटले : १५ प्रवाशी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:08 PM2019-06-02T18:08:11+5:302019-06-02T18:10:13+5:30

हिवरखेड : भरधाव बसचे एकाच वेळी तीन टायर फुटल्याची घटना ३० मे रोजी हिवरखेड ते अकोट मार्गावर घडली.

Three tires of the bus brusted: 15 passengers escaped | भरधाव बसचे तीन टायर फुटले : १५ प्रवाशी बचावले

भरधाव बसचे तीन टायर फुटले : १५ प्रवाशी बचावले

Next
ठळक मुद्दे चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने १५ प्रवाशांचे प्राण वाचले. या मार्गावर तेल्हारा आगाराच्या भंगार बसेस धाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

हिवरखेड : भरधाव बसचे एकाच वेळी तीन टायर फुटल्याची घटना ३० मे रोजी हिवरखेड ते अकोट मार्गावर घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने १५ प्रवाशांचे प्राण वाचले. रस्याच्या दयनीय अवस्थेबरोबरच या मार्गावर तेल्हारा आगाराच्या भंगार बसेस धाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
वारखेड- हिवरखेड-अकोट आणि हिवरखेड- तेल्हारा- आडसुल या दोन्ही राज्य मार्गांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यातच हिवरखेड ते अकोट मार्गाचे नियोजन शून्य आणि निकृष्ट काम सुरू असल्याने खाजगी वाहनासह एसटी महामंडळाच्या बसेस भंगार पेक्षाही खराब स्थितीत पोहोचल्या आहेत. ३० मे रोजी अकोटहुन हिवरखेड मार्गे तेल्हाराकडे बस क्र. एमएच ४० एन ९५१४ हि बस जात होती. दरम्यान हिवरखेड नजीक संकट मोचन मंदिर जवळ ही बस पोहोचली असता तिचे एक टायर फुटल्याने जोरदार आवाज झाला. त्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. टायर फुटण्याच्या पाठोपाठ बसचे आणखी दोन टायर जागीच पंक्चर झाले. एकाच बाजूचे तीनही टायर निकामी झाल्याने पंधरा प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. परंतु बसचालक गौरव प्रकाश पंड यांनी प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. नंतर वाहक ए. एम. धांडे यांनी प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासाकरीता पाठवले. चालकाने तीन टायर निकामी झाल्याबाबत सूचना दिल्यानंतर त्या मार्गे येणाºया दुसºया बसमध्ये 3 टायर पाठविण्यात आली. त्याचवेळी हिवरखेड येथील टी पॉईंट नजीक जळगाव-नागपुर बस क्र.एम एच ४० वाय ५८६२ ही लांब पल्ल्याची बस तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे नागपूरला जाणाºया अनेक प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Three tires of the bus brusted: 15 passengers escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.