सीसीआयचा तीन हजार क्विंटल कपूस जळून खाक
By Admin | Updated: January 12, 2015 01:55 IST2015-01-12T01:39:25+5:302015-01-12T01:55:24+5:30
खामगाव येथील घटना.

सीसीआयचा तीन हजार क्विंटल कपूस जळून खाक
खामगाव (बुलडाणा) : खामगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये जय शाकंबरी इंडस्ट्रीत भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) ठेवलेल्या कापसाला रविवारी अचानक आग लागली. या आगीत सुमारे तीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. खामगाव आणि परिसरात सीसीआयच्या वतीने कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात असून, खरेदी करण्यात आलेल्या कापसावर जय शाकंबरी इंडस्ट्रीजमध्ये प्रक्रीया सुरू होती. दरम्यान रविवारी दुपारी या कापसाला अचानक आग लागली. पाहता- पाहता आगीने उग्र रुप धारण केले. खामगाव येथील अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत सुमारे तीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती सीसीआयचे धरमपाल यांनी दिली. या आगीत सुमारे ३0 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.