‘सायकल चालवा ...पर्यावरण वाचवा ’चा संदेश देत तीन हजार किलोमीटरची सायकल यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:19 IST2018-12-08T15:18:34+5:302018-12-08T15:19:39+5:30
अकोला: पर्यावरण वाचवा ...सायकल चालवा... पाणी वाचवा... असा संदेश देत मुंबईतील प्रकाश केणे देशभर फिरत आहेत. शुक्रवारी या संदेश यात्रे दरम्यान अकोला शहरात आले होते.

‘सायकल चालवा ...पर्यावरण वाचवा ’चा संदेश देत तीन हजार किलोमीटरची सायकल यात्रा
अकोला: पर्यावरण वाचवा ...सायकल चालवा... पाणी वाचवा... असा संदेश देत मुंबईतील प्रकाश केणे देशभर फिरत आहेत. शुक्रवारी या संदेश यात्रे दरम्यान अकोला शहरात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई येथील कस्टम आॅफिसमध्ये नोकरी करीत असणारे प्रकाश दत्तात्रय केणी हे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पश्चिम भारत ते पूर्व भारत अशी तीन हजार किलोमीटरची सायकल यात्रा मुंबई ते ओडिशा व्हाया नागपूर, कोलकाता, ओडिशा अशी करणार आहेत .केणी हे रोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ अश्या प्रकारे १५० किलोमीटर सायकल ने प्रवास करून ओडिशा पोहोचणार आहेत. त्यांचे अकोला आगमन प्रसंगी भाजपचे अकोला महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी स्वागत केले.यावेळी विनोद बोर्डे, राजेंद्र गिरी,बबलू पळसपगार, निलेश निनोरे, वसंता मानकर, धनंजय धबाले, श्याम विंचनकर, लाला जोगी, संजय लाडविकर प्रामुख्याने उपस्थित होते.