१५0 कोतवाल पदांसाठी तीन हजारांवर उमेदवारांनी दिली परीक्षा
By Admin | Updated: June 1, 2015 02:27 IST2015-06-01T02:27:20+5:302015-06-01T02:27:20+5:30
६२७ उमेदवार गैरहजर; गुणांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर.

१५0 कोतवाल पदांसाठी तीन हजारांवर उमेदवारांनी दिली परीक्षा
अकोला: जिल्हा निवड समितीमार्फत जिल्ह्यातील १५0 कोतवाल पदांसाठी अकोल्यातील १६ केंद्रांवर रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. ३ हजार २४९ विद्यार्थ्यांनी कोतवाल पदाची परीक्षा दिली असून, ६२७ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेनंतर उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली.
जिल्ह्यात १0५ कोतवालांची पदे रिक्त असून, ही पदे भरण्याची प्रक्रिया जिल्हा निवड समितीमार्फत सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी जिल्ह्यातील ३ हजार ८७६ उमेदवारांचे ह्यऑनलाइनह्ण अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. १५0 कोतवाल पदांसाठी रविवार, ३१ मे रोजी सकाळी ११ ते ११.४५ या वेळेत अकोल्यातील १६ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. एकूण ३ हजार ८७६ उमेदवारांपैकी ३ हजार २४९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली असून, उर्वरित ६२७ उमेदवार या परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेनंतर पेपरची तपासणी करण्यात आली व त्यानंतर या परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी रविवारी रात्री ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय अधिकार्यांमार्फत घेण्यात येणार आहेत.