अकोला जिल्ह्यात तिघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:57 IST2017-09-17T19:57:12+5:302017-09-17T19:57:45+5:30
हिवरखेड : पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या वेगवेगळ्या गावां तील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. हिवरखेड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अकोला जिल्ह्यात तिघांची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या वेगवेगळ्या गावां तील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. हिवरखेड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हिवरखेड येथील सुरेश ऊर्फ बाळू अवचार यांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. खंडाळा येथील नीलेश ऊर्फ नारायण मधुसुदन गावंडे यांनी शेतात विष घेऊन आत्महत्या केली, तसेच झरी बाजार येथील प्रवीण बक्षू तायडे (२५) या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. प्रवीण तायडे याला हिवरखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले असता त्याला पुढील उपचारासाठी अकोट येथे रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
-