पोलीस गस्तीसाठी तीन अत्याधुनिक वाहने

By Admin | Updated: May 27, 2017 00:43 IST2017-05-27T00:43:30+5:302017-05-27T00:43:30+5:30

पोलीस अधीक्षक कलासागर यांनी केला शुभारंभ

Three state-of-the-art vehicles for police patrol | पोलीस गस्तीसाठी तीन अत्याधुनिक वाहने

पोलीस गस्तीसाठी तीन अत्याधुनिक वाहने

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरासह जिल्ह्यातील पोलीस गस्तीला मजबूत करण्यासाठी अकोला पोलीस दलात आणखी तीन अत्याधुनिक कार शुक्रवारी विधिवत पूजा केल्यानंतर कार्यरत करण्यात आल्या. गस्तीवरील पोलिसांच्या मदतीसाठी ही वाहने उपलब्ध राहणार असून, परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते यांनी या अत्याधुनिक कारचा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर शुभारंभ करण्यात आला.
सद्यस्थितील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या बीएम गस्तीच्या वाहनांमध्ये एक दंडा, एक वायरलेस आहे. पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घटनेची माहिती बीएम नियंत्रण कक्षाला वायरलेसवरून देते. यावेळी परिस्थितीनुसार हवी ती मदत मागण्यात येते; मात्र ही मदत यायला वेळ होत असल्याने अनेक घटना रौद्ररूप धारण करतात, त्यामुळे पोलिसांच्या मदतीला अत्याधुनिक शस्त्र आणि प्रत्येक घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक असलेली तीन वाहने अकोला पोलीस दलात दाखल झाले असून, ही वाहने शुक्रवारी कार्यरत करण्यात आली आहेत. या कारचे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलीस उपनिरीक्षक उमेश माने पाटील, सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील, खदानचे ठाणेदार गजानन शेळके, रामदासपेठचे शैलेश सपकाळ, जुने शहर पोलीस स्टेशनचे गणेश अणे, डाबकी रोडचे सुनील सोळंके, एमआयडीसी ठाणेदार किशोर शेळके आणि अकोट फैलचे राणे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Three state-of-the-art vehicles for police patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.