अनधिकृत बांधकामप्रकरणी तिघांवर गुन्हा
By Admin | Updated: October 1, 2014 01:19 IST2014-10-01T01:19:17+5:302014-10-01T01:19:17+5:30
अकोला येथील तीन भूखंड मालकांविरूद्ध गुन्हा दाखल.

अनधिकृत बांधकामप्रकरणी तिघांवर गुन्हा
अकोला: अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शहरातील तिघा भूखंड मालकांवर खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक नगररचनाकार संदीप मधुकर गावंडे यांच्या तक्रारीनुसार गांधी नगरातील पक्की खोलीमध्ये राहणार्या शारदा सुरेंद्र अरोरा, गोरक्षण रोडवरील माधव नगर चौकात राहणार्या एकता राम देवानी आणि हरीश कॉलनीत राहणार्या स्नेहल राहुल सावजी यांनी ३0 सप्टेंबरपूर्वी त्यांच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केल्याचे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र साहेबराव टापरे यांना निरीक्षणादरम्यान दिसून आले. या तिघा भूखंड मालकांना महापालिकेने नोटीस पाठविल्या; परंतु त्यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही. त्यामुळे मनपाने पोलिस तक्रार केली. या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.