शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

‘कोरोना’च्या सावटातही अधिपरिचारिकांना निवासस्थान खाली करण्याचे आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:25 AM

तीन अधिपरिचारिकांचे कुटुंब रस्त्यावर आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला आहे.

ठळक मुद्देअधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी तिन्ही अधिपरिचारिकांना निवासस्थान रिक्त करण्याचा आदेश दिला आहे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने शहरात कोणी भाड्याने घरही देत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात कोरोनाची संचारबंदी असताना अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या एका आदेशाने तीन अधिपरिचारिकांचे कुटुंब रस्त्यावर आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला आहे, तर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने शहरात कोणी भाड्याने घरही देत नसल्याचे चित्र समोर आले आहे.गोरक्षण रोडस्थित नेहरू पार्क समोर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. जवळपास सहा ते सात वर्षांपूर्वी तत्कालीन अधिष्ठाता बोभाटे यांनी मनीषा इंगोले, चंदा भागवत आणि ममता डोंगरदिवे (शहा) या तिन्ही अधिपरिचारिकांना निवासस्थान उपलब्ध करून दिले होते. डॉक्टर मागणी करतील त्यावेळेस निवासस्थान रिक्त करून देणार असल्याचे लिहून दिले होते; परंतु हे निवासस्थान वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांसाठी असून, चुकीच्या पद्धतीने वर्ग तीनच्या कर्मचाºयांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी तिन्ही अधिपरिचारिकांना निवासस्थान रिक्त करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय, कोरोनाच्या पृष्ठभूमीवर अत्यावश्यक सेवा म्हणून औषधवैद्यकशास्त्र व शल्यचिकित्साशास्त्र विषयातील अध्यापकांना हे निवासस्थान दिले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

...तर इतरांसाठी कायदा का नाही?संचारबंदी असताना नियमबाह्य बाब म्हणून निवासस्थान खाली करण्याचा आदेश दिला जातो; पण ग्रंथपाल यांच्यासह अधिष्ठातांच्या वाहन चालकांसाठी हा कायदा लागू होत नाही का, असा सवाल यावेळी बेघर झालेल्या अधिपरिचारिकांनी उपस्थित केला.

बदलीनंतरही ‘ते’ कुटुंब निवास्थानातच!शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील काही अधिकारी, कर्मचाºयांची बदली इतर जिल्ह्यांमध्ये झाली आहे. असे असतानाही काही कुटुंब येथील निवासस्थानाचा उपभोग घेत असल्याची माहिती आहे.

ती निवासस्थाने डॉक्टरांसाठी आहेत. त्यामुळे संबंधित अधिपरिचारिकांना निवासस्थान रिक्त करण्याचा आदेश दिला. शिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील वर्ग-३ कर्मचाºयांच्या निवासस्थानी त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली; परंतु ते जाण्यास नकार देत आहेत.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला