शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

 आणखी तिघांचा बळी; ६५ नवे पॉझिटिव्ह; ३१ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 7:09 PM

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी अकोला शहर, वाडेगाव व मुर्तीजापूर येथील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १८९ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी अकोला शहर, वाडेगाव व मुर्तीजापूर येथील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १८९ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५७९६ झाली आहे. दरम्यान, आणखी ३१ जणांनी कोरोनावर मात केल्याने सद्यस्थितीत १२०४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ४९ रुग्णांमध्ये तेल्हारा तालुक्यातील दापूरा येथील सहा, एमरॉल्ड कॉलनी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येक तीन, गोडेबोले प्लॉट, मोठी उमरी, बाळापूर, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, सोपीनाथ नगर, अशोक नगर, शास्त्री नगर, लहान उमरी, लंगडगंज, बोरगाव मंजू, संभाजी नगर, मलकापूर, नानकनगर, दहिगाव गावंडे, नागे लेआऊट, आश्रय नगर, कौलखेड, चांदुर, गाडगे नगर, आदर्श कॉलनी, जूना तापडीया नगर, सिव्हील लाईन, जीएमसी, केशव नगर, सागूर अडगाव, कृषी नगर, संभाजी नगर, कार्ला बु. ता. तेल्हारा, तेल्हारा, चोहट्टा बाजार, खिरपूरी ता. बाळापूर, रुस्तमाबाद ता. बार्शिटाकळी व कट्यार येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या १६ रुग्णांमध्ये अकोट येथील चार, जठारपेठ येथील दोन, मुर्तिजापूर, खदान, डाबकी रोड, रेल्वे स्टेशन जवळ, शंकर नगर, जीएमसी हॉस्टेल, मलकापूर, मुर्तिजापूर रोड, चांदूर व गीता नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.तीन महिलांचा मृत्यूमंगळवारी अकोला शहरातील राजेश्वर कॉलनी येथील ५६ वर्षीय महिला, बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ६५ वर्षीय महिला व मुर्तिजापूर येथील ६२ वर्षीय महिला अशा तिन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.३१ जणांना डिस्चार्जमंगळवारी उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच, कोविड केअर सेंटर, हेंडज येथून १२, कोविड केअर सेंटर, बाळापूर येथून चार, कोविड केअर सेंटर, अकोट येथून १० अशा एकूण ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१२०४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७९६ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४४०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२०४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या