दुचाकी चोरट्यास तीन महिन्यांची शिक्षा
By Admin | Updated: May 16, 2015 00:39 IST2015-05-16T00:39:40+5:302015-05-16T00:39:40+5:30
तीन महिने ६ दिवसांची शिक्षा व १00 रुपये दंड.

दुचाकी चोरट्यास तीन महिन्यांची शिक्षा
अकोला - सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर येथून दुचाकी चोरणार्या चोरट्यास न्यायाधीश गजाला अलमुदी यांच्या न्यायालयाने शुक्रवारी ३ महिने ६ दिवसांची शिक्षा सुनावली. यासोबतच १00 रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी तीन दिवसांची शिक्षा न्यायालयाने चोरट्यास सुनावली. रामनगर येथील रहिवासी श्यामलाल अग्रवाल यांची दुचाकी गणेश गवळी नामक चोरट्याने ८ फेब्रुवारी रोजी लंपास केली होती. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी गणेश गवळी याच्याविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी न्यायाधीश गजाला अलमुदी यांच्या न्यायालयाने आरोपी गणेश गवळी यास तीन महिने ६ दिवसांची शिक्षा व १00 रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी तीन दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. के. जी. महाजन यांनी कामकाज पाहिले.