शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

एसटी बसचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लक्झरीचालकास तीन महिन्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 9:46 PM

​​​​​​​अकोला : भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून एसटी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या श्रीकृष्ण नेमाडे नामक आरोपीस बाळापूरचे प्रथम श्रेणी न्यायाधीश भूषण काळे यांनी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. 

ठळक मुद्देबाळापूर न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून एसटी चालकाच्या मृत्यूस  कारणीभूत ठरलेल्या श्रीकृष्ण नेमाडे नामक आरोपीस बाळापूरचे प्रथम श्रेणी न्यायाधीश  भूषण काळे यांनी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. अकोला ते शेगाव  बस क्रमांक एम. एच. ४0 - ८३३९  ही शेगावकडे जात असताना  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कान्हेरी फाटा येथे विरुद्ध दिशेने येणार्‍या लक्झरी  बस क्रमांक एम. एच.३१ सीक्यू  २0९९ने बसला धडक दिली होती.   यामध्ये एसटीच्या  समोरील भाग पूर्ण क्षतीग्रस्त झाला होता व २0 प्रवासी जखमी झाले होते. जखमीपैकी  एसटी वाहक एम. पी. मगर यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता.  बाळापूर पोलिसांनी लक्झरी चालक श्रीकृष्ण नेमाडे विरुद्ध भादंवी कलम २७९, ३३७ व  ३0४ अ  नुसार गुन्हा दाखल केला. तत्कालीन एपीआय चौधरी यांनी तपास पूर्ण करून  आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शीतल  शशिकांत राऊत यांनी ११ साक्षीदार तपासले. आरोपीने निष्काळजीपणे वाहन चालविले  ही बाब साक्षीदाराच्या बयाणात समोर आली. उभयतांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर  न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावत आरोपीस सर्वच गुन्ह्यात दोषी ठरवत  तीन महिन्यांचा कारावास ठोठावला. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत.  तसेच दोन हजार रुपये आरोपीस भरावा लागेल असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले  आहे.

टॅग्स :BalapurबाळापूरCourtन्यायालय