आगीच्या तीन घटना!

By Admin | Updated: April 21, 2017 01:43 IST2017-04-21T01:43:32+5:302017-04-21T01:43:32+5:30

अकोला : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत एका युवकाचा मृत्यू, तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटना २० एप्रिल रोजी घडल्या.

Three incidents of fire! | आगीच्या तीन घटना!

आगीच्या तीन घटना!

अकोला : जिल्ह्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत एका युवकाचा मृत्यू, तर लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटना २० एप्रिल रोजी घडल्या.
अकोट तालुक्यातील देऊळगाव गावंडे येथे गुरुवारी दुपारी अचानक आग लागून अनेक घरे जळून खाक झाली, तसेच घरातील कापूस आगीपासून वाचविण्याच्या प्रयत्नात विजेच्या धक्क्याने प्रवीण श्रीधर बोदडे याचा मृत्यू झाला. आगीने शेजारच्या घरांनाही वेढल्याने या घरांमधील साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दुसरी घटना अकोट तालुक्यातील एदलापूर शिवारात घडली. प्रिंप्री खुर्द येथील संजय रावणकार यांच्या एदलापूर शेतशिवारात असलेल्या आठ एकरातील केळीला दुपारी अचानक आग लागली. या आगीत आठ एकरातील केळीचे तसेच स्प्रिंकलर सेट जळाल्याने रावणकार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यातील अनकवाडी येथे गोठ्यांना आग लागून कुटार व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे ग्रामस्थांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. 

Web Title: Three incidents of fire!