अकोला, दि. १४- सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनच्या हद्दीत धारदार शस्त्र घेऊन दुचाकीवर फिरणार्या तिघांना सिव्हिल लाइन पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.सिव्हिल लाइन पोलीस सोमवारी गस्तीवर असताना पंकज रामदास काळे, उमेश अंबादास अटाळकर आणि गोरे नामक युवक हे तिघे जण एका दुचाकीवर जात असताना त्यांच्याकडे शस्त्र असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी या तिघांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यानंतर झडती घेतली असता यामधील काळे व अटाळकर या दोघांकडून दोन धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. सिव्हिल लाइन पोलिसांनी या तिघांविरुद्ध कारवाई केली.
शस्त्र घेऊन फिरणारे तिघे गजाआड
By admin | Updated: March 15, 2017 02:43 IST