अकोला शहरात आगीच्या तीन घटना
By Admin | Updated: March 30, 2017 03:05 IST2017-03-30T03:05:44+5:302017-03-30T03:05:44+5:30
शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अकोला शहरात आगीच्या तीन घटना
अकोला, दि. २९- बुधवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत शहर आणि शहराबाहेरील भागात आग लागल्याच्या तीन घटना घडल्या. यामुळे मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांना चांगलीच धावाधाव करावी लागली.
बैदपुरा परिसरात राहणारे उजेर खान अब्दुल रहीम खान यांच्या मालकीच्या औद्योगिक वसाहत क्रमांक-४ मधील भंगार भरलेल्या गोदामाला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी दोन बंबांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. यात उजेर खान यांचे ६0 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील गवताला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळावर पोहोचून आग नियंत्रणात आणली. तिसरी जठारपेठ परिसरातील एका बँकेत आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणी अग्निशमन कर्मचार्यांनी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. बँकेतील आग नियंत्रणात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.