शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महापालिके च्या तीन कर्मचाऱ्यांची सेवा थांबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:00 IST

नगररचना विभागातील दोन आणि मनपात आस्थापनेवर एका वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय ७ मे रोजी आयोजित भाजपाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकाही कर्मचारी चक्क आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण होऊन मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत आहेत. कुशल कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासाठी प्रशासनाने खासगी एजन्सीमार्फत ‘आऊट सोर्सिंग’चा पर्याय निवडला आहे.या निर्णयाला भाजपमधील अंतर्गत गटबाजीसह शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्यासोबतच्या राजकीय स्पर्धेची किनार असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.

अकोला: महापालिकेत मानधन तत्त्वावर कार्यरत १६७ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती दिली जाते. संबंधित कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यासाठी महासभेच्या ठरावाची आवश्यकता असल्याचे हेरून नगररचना विभागातील दोन आणि मनपात आस्थापनेवर एका वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय ७ मे रोजी आयोजित भाजपाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. या निर्णयामागे भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे. मनपातील वरिष्ठ अधिकाºयांची पदे रिक्त असल्यामुळे खुद्द महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनीच शासनाकडे बदलीसाठी अर्ज सादर केल्याने मनपा कर्मचाºयांच्या उचलबांगडीच्या निर्णयावर आयुक्त वाघ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या मुख्य सभागृहात बुधवारी (९ मे) सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर विकासाच्या विविध मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. महापालिकेच्या विविध विभागात अकुशल कर्मचाºयांचा मोठ्या प्रमाणात भरणा असून, काही कर्मचारी चक्क आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण होऊन मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत आहेत. याचा परिणाम संबंधित विभागाच्या कामकाजावर होतो. त्यामुळे भविष्यात मनपात कंत्राटी तत्त्वावर कुशल कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासाठी प्रशासनाने खासगी एजन्सीमार्फत ‘आऊट सोर्सिंग’चा पर्याय निवडला आहे. तत्पूर्वी मनपात १९९८ पासून मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना दर सहा महिन्यांनी मुदतवाढ दिली जाते. सर्वसाधारण सभेला मुदतवाढ देण्याचे अधिकार असले तरी प्रशासनालाही कर्मचारी सेवेत ठेवायचे किंवा नाहीत, याचा निर्णय घेण्याचा सर्वाधिकार आहे. सर्वसाधारण सभेपूर्वी पक्षाच्या बैठकीत भाजपकडून विषय सूचीवर चर्चा केली जाते. त्यावेळी मनपात आस्थापनेवर एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत अधिकारी आणि नगररचना विभागात मागील २० वर्षांपासून सेवा देणाºया मानधनावरील दोन कर्मचाºयांची सेवा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. या निर्णयाला भाजपमधील अंतर्गत गटबाजीसह शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्यासोबतच्या राजकीय स्पर्धेची किनार असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षमनपाचा प्रशासकीय डोलारा विस्कळीत झाला आहे. अशा विपरीत परिस्थितीत भाजपाने महत्त्वाची जबाबदारी असणाºया तीन कर्मचाºयांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहाने सेवा बंद करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर आयुक्त जितेंद्र वाघ त्यांच्या प्रशासकीय अधिकारांचा वापर करतात की, ठराव मंजूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका