हिवरखेडच्या तीन व्यापारी, अडत्यांविरुद्ध फसवणूकप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: June 28, 2017 18:55 IST2017-06-28T18:55:25+5:302017-06-28T18:55:25+5:30
दुसऱ्यांच्या नावावर नाफेडला तूर विकली : दोघा जणांना अटक

हिवरखेडच्या तीन व्यापारी, अडत्यांविरुद्ध फसवणूकप्रकरणी गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : नाफेडने यंदा शेतकऱ्यांकडून हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी तेल्हारा येथे सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर हिवरखेड येथील तीन व्यापाऱ्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्याच लोकांच्या नावावर नाफेडला तुरीची विक्री करून शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार तेल्हारा येथील सहायक निबंधकांनी तेल्हारा पोलीस स्टेशनला दाखल केली. याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी २७ जूनच्या रात्री ११.४५ वाजता तीन व्यापारी, अडत्यांविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.यापैकी दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.