बांधकामावरील साहित्य चोरणारे तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:32 IST2021-03-04T04:32:50+5:302021-03-04T04:32:50+5:30

दोन अल्पवयीन मुलांचा समावेश अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोड वरील एका बांधकामावरील सिमेंट, ग्रॅनाईट व इतर ...

Three arrested for stealing construction materials | बांधकामावरील साहित्य चोरणारे तिघे ताब्यात

बांधकामावरील साहित्य चोरणारे तिघे ताब्यात

दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरक्षण रोड वरील एका बांधकामावरील सिमेंट, ग्रॅनाईट व इतर साहित्य ऑटोमध्ये भरून पळून जात असलेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले; मात्र यामध्ये दोघे जण अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

कौलखेड येथील रहिवासी अविनाश राऊत यांचे गौरक्षण रोडवर बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरील २२ पोते सिमेंट लोहा तसेच ग्रॅनाईट व टाईल्स अज्ञात चोरटे ऑटोमध्ये भरून पळून जात होते. ही माहिती त्यांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने ऑटोचा पाठलाग करून राहुल मोहन वाघमारे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ऑटो व सिमेंट तसेच मुद्देमाल जप्त केला. त्याचे दोन साथीदार अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार देवराव खंडेराव तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Three arrested for stealing construction materials