शेळ्या चोरी प्रकरणात तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST2021-03-29T04:13:08+5:302021-03-29T04:13:08+5:30
हातगाव येथील नयन कनोजे यांनी आपल्या मालकीच्या ६ बकऱ्या हातगाव बसथांब्याजवळ असलेल्या गोठ्यात बांधल्या होत्या. ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या ...

शेळ्या चोरी प्रकरणात तिघांना अटक
हातगाव येथील नयन कनोजे यांनी आपल्या मालकीच्या ६ बकऱ्या हातगाव बसथांब्याजवळ असलेल्या गोठ्यात बांधल्या होत्या. ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, रविवारी या प्रकरणातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुबेर शाह लड्डू शाह मदार (२२) रा. चोहोट्टा बाजार, आशिफ खान शेर खान (३५) , मोबीन शाह कासम शहा (३५) दोघेही रा. इंदिरा नगर अकोट फैल यांना ताब्यात घेऊन मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून १५ हजार रुपये रोख व २ लाख रुपये किमतीची कार असा २ लाख १५ हजाराचा ऐवज जप्त केला.