वन रक्षकाला जिवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: April 26, 2017 19:34 IST2017-04-26T19:34:58+5:302017-04-26T19:34:58+5:30
खेटी : चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे वन रक्षकाला गावातील चौघांनी धक्काबुक्की केली,व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ एप्रिलला सायांळी ५ वाजता घडली.

वन रक्षकाला जिवे मारण्याची धमकी
खेटी : चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे वन रक्षकाला गावातील चौघांनी धक्काबुक्की केली,व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ एप्रिलला सायांळी ५ वाजता घडली. या प्रकरणी चौघांना चान्नी पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वन रक्षक गोपाल सुरेश गायगोंड हे आपल्या सहकाऱ्यांसह सावरगाव जंगलात गस्तीवर असताना असतांना अवैध वृक्षतोड करतांना एक जण त्यांना आढळला. वन रक्षकांनी तेथे धाव घेतली असता तो युवक पळून गेला. त्या ठिकाणी दोन सागवानचे झाडे तोडलेले आढळून आले.नंतर वन रक्षक आपल्या सहकार्यासह निवासस्थानी परत जात असतांना गावातील चार जणांनी त्यांना धक्काबुक्की केली व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वन रक्षक गोपाल सुरेश गायगोंड यांच्या फियार्दीवरुन २५ एप्रिल रोजी रात्री चान्नी पोलिसांनी आरोपी ज्योतीलाल राठोड , रामदास आडे, अविनाश आडे, विष्णु राठोड, या चौघांविरुद्घ कलम ३५३,३३२,३७९,२९४,५०६,३४ सह कलम २६ ,२६ ( १ )( ई फ ड ) भारतीय वन अधिनियम १९२७, नुसार गुन्हा दाखल केला आहे. चान्नी पोलिसांनी त्याच दिवशी चौघांना अटक करुन २६, एप्रिल रोजी पातुर न्यायालयात हजर केले असता चौघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गजानन पोटे करीत आहे.