शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

मोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारो महिला होणार सहभागी; महिलांच्या बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:32 PM

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या  मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत महिलांनी हजारोच्या संख्यने सहभागी होण्याचा निर्धार, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिलांच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्दे १० फेबु्रवारी रोजी शहरातील गृहिणींच्यावतीने मोर्णा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शहरातील महिला लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी महिलांची बैठक घेण्यात आली.मोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार महिलांच्या बैठकीत करण्यात आला.

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी राबविण्यात येणाऱ्या  मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत महिलांनी हजारोच्या संख्यने सहभागी होण्याचा निर्धार, गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिलांच्या बैठकीत करण्यात आला.जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व कर्मचारी संघटनांच्यावतीने लोकसहभागातून मोर्णा स्वच्छता मोहीम गत १३ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आली. दर शनिवारी लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मोहिमेच्या पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी शहरातील गृहिणींच्यावतीने मोर्णा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शहरातील महिला लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक हर्षदा काकड, मनपा सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाच्या भारती खंडेलवाल, माजी महापौर सुमन गावंडे, नगरसेविका गीतांजली शेगोकार, सुनीता अग्रवाल, सुजाता अहीर, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.वारे, अरुंधती शिरसाट, ज्योती मलीये, शामला खोत, धनश्री गाडे यांच्यासह विविध महिला बचत गट, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी, विविध शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या. १० फेबु्रवारी रोजी राबविण्यात येणाºया मोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार महिलांच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजितसिंह बछेर, प्रशांत राठी उपस्थित होते. बैठकीचे संचालन प्रकाश अंधारे यांनी केले.मोर्णा स्वच्छतेसाठी ‘मातृशक्ती’ने एकजूट व्हावे - जिल्हाधिकारी१० फेबु्रवारी रोजी राबविण्यात येणाºया मोर्णा स्वच्छता मोहिमेसाठी मातृशक्तीने एकजूट होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी यावेळी केले. शहरातील गृहिणी, महिला अधिकारी-कर्मचारी, सेवाभावी संस्था, संघटनांच्या पदाधिकारी, नगरसेविका, अंगणवाडीसेविका, परिचारिका, अधिकारी-कर्मचाºयांच्या पत्नी यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

 

टॅग्स :Morna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमAkola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय