शेकडो ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या !

By Admin | Updated: January 15, 2016 01:55 IST2016-01-15T01:55:58+5:302016-01-15T01:55:58+5:30

मजीप्रा तोडफोड प्रकरणी दातकर यांच्यासह कार्यकर्त्यांवरील दंगलीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी.

Thousands of villagers stab in police station! | शेकडो ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या !

शेकडो ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या !

अकोला: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयामध्ये बुधवारी तोडफोड करणार्‍या शिवसेनेचे गोपाल दातकर यांच्यासह अकरा जणांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दंगलीसह मारहाण व तोडफोडीचे गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली. दातकर व कार्यकर्त्यांवरील दंगल व मारहाणीचे गुन्हे मागे घ्या, यासाठी आठ गावांतील शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात धडक देऊन ठिय्या आंदोलन केले. थकीत पाणीपट्टीपोटी ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत २१ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने, दहीहांडा व हिंगणी परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) कार्यकारी अभियंता कार्यालयात बुधवारी तोडफोड केली होती.

Web Title: Thousands of villagers stab in police station!