शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

महामार्ग रुंदीकरणासाठी निंबाच्या ९९७ वृक्षांसह हजारो झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:51 IST

राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या ९९७ झाडांची कत्तल करण्यात येत आहे.

- संजय उमक  लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: अंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूर राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या ९९७ झाडांची कत्तल करण्यात येत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाकडून त्यासाठी रीतसर परवानगी घेतली असली तरी पर्यावरणाचा ºहास होत आहे.एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रचंड पैसा खर्ची घालत असताना शासनाकडूनच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते. याच पद्धतीने अंजनगाव-दर्यापूर-मूर्तिजापूर या ५२ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाने गती घेतली आहे. रस्त्याचे ७ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व दीड-दोनशे वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या निंबाच्या ९९७ व बाभळीसह हजारो महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे.कडूलिंबाचा. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुळातील हा वृक्ष असून, त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅझॅडिराक्टा इंडिका असे आहे. द. भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशांत म्यानमार हा वृक्ष आढळतो. अशा वृक्षतोडीने आता आयुर्वेदात मानाचे स्थान असलेल्या निंबाच्या व बाभळीच्या झाडांचे भवितव्य धोक्यात आले आहे.२०१७-१८ च्या अर्थसंकल्प कार्यक्रमांतर्गत, १३१ कोटी रुपये खर्चून ५२ किलोमीटर बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हजारो झाडे मुळापासून उपटून काढावी लागणार आहे. त्यासाठी झाडांना जमीनदोस्त करण्यासाठी किमान २० लोकांची टीम काम करीत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूंनी उभी असलेली हजारो झाडे कापण्यासाठी वन विभागाकडे तशी रीतसर परवानगीसुद्धा मागितली आहे. या वृक्षतोडीने प्रवाशांना अथवा वाटसरूंना विसाव्यासाठी एकही झाड शिल्लक राहणार नसल्याने वृक्षप्रेमी वर्गात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडांची लागवड संबंधितांनी करावी व त्याचे संगोपन करून ती मोठी करावी, अशी मागणीही याप्रसंगी होत आहे.

शासनाकडून रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली वृक्ष तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहे. यामुळे पर्यावरणाचा प्रचंड ºहास होणार आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. यापूर्वी संबंधित विभागाला लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.- सतीश अग्रवाल,पर्यावरणप्रेमी, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरhighwayमहामार्ग