चोरट्यांनी पळविले एक हजार लिटर डिझेल!

By Admin | Updated: January 30, 2017 03:27 IST2017-01-30T03:27:40+5:302017-01-30T03:27:40+5:30

पिंपळगावराजा येथील पेट्रोल पंपावरील घटना

Thousands of thieves ran out of a thousand liters of diesel! | चोरट्यांनी पळविले एक हजार लिटर डिझेल!

चोरट्यांनी पळविले एक हजार लिटर डिझेल!

पिंपळगाव राजा, दि. २९- येथील बसस्टॉप पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कृष्णा पेट्रोलपंपाच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक हजार लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी कृष्णा पेट्रोलीयमचे मालक धनंजय देशमुख यांनी पिंपळगावराजा पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
या बाबत माहिती अशी की, पिंपळगावराज येथून एक कि.मी. अंतरावर असलेल्या कृष्णा पेट्रोलयमवर २८ जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी डिझेल टाकीचे कुलुप तोडून कॉम्प्रेशर मशीचनच्या सहायाने एक हजार लिटर डिझेलची चोरी करून पोबारा केला. यामध्ये पेट्रोल पंप मालकाचे ५0 ते ६0 हजार रूपयाचे नुकसान झाले. पिंपळगावराजा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर रविवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. डिझेलच्या टाक्या जवळून काही अंतरावर डिझेल सांडल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी डिझेल सांडलेल्या मातीचा पंचनामा केला.

Web Title: Thousands of thieves ran out of a thousand liters of diesel!