ख-या तृतीयपंथींनी बनावटांना बदडले!

By Admin | Updated: October 10, 2016 03:14 IST2016-10-10T03:14:41+5:302016-10-10T03:14:41+5:30

बाळापूर बायपासवर दोन बनावट तृतीयपंथींना दिला चोप.

Thousands of thieves have made fake! | ख-या तृतीयपंथींनी बनावटांना बदडले!

ख-या तृतीयपंथींनी बनावटांना बदडले!

अकोला, दि. ९- बाळापूर बायपासवर बनावट तृतीयपंथी एका पाणीपुरी चालकाला पैसे मागत असतानाच खरे तृतीयपंथी या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी दोन बनावट तृतीयपंथींना चांगलाच चोप दिला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला.
दसरा दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, दिवाळीही लवकरच आहे. या काळात व्यापारी, दुकानदार व उद्योजकांना पैसे मागण्यासाठी तृतीयपंथींची मोठी रेलचेल असते. तृतीयपंथींना व्यापार्‍यांकडून पैसे मिळत असल्याने काही युवक तृतीयपंथीची वेशभूषा धारण करून पैसे मागत असल्याचेही बाळापूर रोडवर झालेल्या प्रकारामुळे उघड झाले आहे. बाळापूरकडे जाणार्‍या रोडवर एक दुचाकीचे शोरूम असून, या शोरूमनजीक पाणीपुरीची गाडी असून, या पाणीपुरी चालकास दोन युवक तृतीयपंथीच्या वेशभूषेत येऊन पैशाची मागणी करीत होते. हा प्रकार खर्‍या तृतीयपंथींच्या निदर्शनास येताच त्यांनी बाळापूर रोड गाठून या दोन्ही खोट्या तृतीयपंथीयांना चांगलेच झोडपले. तृतीयपंथीच खर्‍या तृतीयपंथींना खोट्या तृतीयपंथींचे रस्त्यावर कपडे फाडल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

Web Title: Thousands of thieves have made fake!