हजारो मुलांना मातेपासून एड्सची लागण!

By Admin | Updated: June 12, 2015 02:01 IST2015-06-12T02:01:35+5:302015-06-12T02:01:35+5:30

गर्भधारणेदरम्यान योग्य उपचार न केल्यामुळे पाच वर्षांत ११५३ मुलांना एड्सची लागण झाली.

Thousands of children infected with AIDS! | हजारो मुलांना मातेपासून एड्सची लागण!

हजारो मुलांना मातेपासून एड्सची लागण!

विवेक चांदूरकर/अकोला : मातेपासून एड्ससारख्या जीवघेण्या आजाराची लागण झालेल्या मुलांची संख्या राज्यात हजारोंच्या घरात आहे. गर्भधारणेदरम्यान मातेने योग्य उपचार न केल्यामुळे पाच वर्षांत ११५३ मुलांना डोळे उघडण्यापूर्वीच या भयंकर रोगाने ग्रासले आहे.
देशात एड्सविषयी कितीही जनजागृती होत असली तरी, या आजाराची लागण होणार्‍या रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. एड्स प्रामुख्याने तीन प्रकारांमधून होतो. एड्सग्रस्त व्यक्तीशी असुरक्षित संबंध, एड्सबाधीत व्यक्तीने कलेले रक्तदान, एड्सग्रस्त व्यक्तीला दिलेले इंजेक्शन वापरण्यात येणे या बाबींचा समावेश आहे. यासोबतच मातेपासून मुलांनाही एड्सची लागण होते. मातेपासून मुलांना एड्सची लागण होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. २00९ ते १0 या वर्षात २१३ मुलांना मातेपासून एड्सची लागण झाली होती. २0१0-११ वर्षात १६७ मुलांना, २0११-१२ वर्षात २१७ मुलांना, २0१२-१३ वर्षात २५३ मुलांना, २0१३-१४ वर्षात १७३ मुलांना, तर २0१४ -१५ वर्षात १३0 मुलांना मातेपासून एड्सची लागण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोयायटी मुंबईने माहितीच्या अधिकारात दिली आहे. मातेने योग्य मार्गदर्शनात उपचार घेतले तर जन्माला येणारे मुल एड्समुक्त असू शकते; मात्र अनेक एड्सग्रस्त महिला उपचार घेत नाहीत. परिणामी निष्पाप जीवाला आयुष्याची शिक्षा भोगावी लागते.

*एड्सग्रस्त महिलेलाही होवू शकते एड्समुक्त मूल
एड्सग्रस्त महिलेला गर्भधारणा झाली, तरीही तिला होणारे मूल एड्समुूक्त होवू शकते; मात्र त्याकरिता महिलेने गर्भधारणेपासूनच डॉक्टरांशी सल्ला-मसलत करून योग्य उपचार करून घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमित घ्यायला हवी.


वर्ष              मातेपासून एचआयव्हीबाधित रूग्ण
२00९ - १0               २१३
२0१0 - ११                १६७
२0११ - १२                २१७
२0१२ - १३                 २५३
२0१३ - १४                  १७३
२0१४ - १५                  १३0

Web Title: Thousands of children infected with AIDS!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.