‘त्या’ युवा शेतक-याचा मृत्यू

By Admin | Updated: May 21, 2015 01:47 IST2015-05-21T01:47:53+5:302015-05-21T01:47:53+5:30

झुंज संपली; विद्युत जोडणी न मिळाल्याने महावितरणच्या कार्यालयातच घेतले होते विष.

'Those' young farmer-death | ‘त्या’ युवा शेतक-याचा मृत्यू

‘त्या’ युवा शेतक-याचा मृत्यू

हिवरखेड/तेल्हारा(जि. अकोला) : विद्युत जोडणी न मिळाल्याने मंगळवारी हिवरखेड येथील महावितरणच्या कार्यालयात कीटकनाशक प्राशन केलेल्या युवा शेतकर्‍याचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनोद रामदास खारोडे (वय २४. रा. तळेगाव बाजार) असे जीवन संपविलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. विनोद खारोडेने कर्ज काढून शेतात बोरअरवेल खोदली. सिंचन करून पीक घेऊ, या उद्देशाने त्याने विद्युत जोडणीसाठी ८ मे २0१३ रोजी महावितरणच्या हिवरखेड येथील कार्यालयात अर्ज केला. त्याने ६ हजार २00 रुपये शुल्कही भरले, मात्र, विद्युत जोडणी मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही विद्युत जोडणी मिळत नसल्याने विनोद मंगळवारी सकाळी हिवरखेड येथील महावितरणच्या कार्यालयात पोहोचला. त्याने पुन्हा विद्युत जोडणीची मागणी लावून धरली. मात्र, त्याच्या पदरी निराशाच आली. परिणामी त्याने कार्यालयातच सोबत आणलेले कीटकनाशक प्राशन केले. त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा बुधवारी मृत्यू झाला. अंतिमसंस्काराला महसूल अधिका-यांची उपस्थिती विनोद खारोडेवर तळेगाव बाजार येथे बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे, तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार किटे यांच्यासह रमेश दुतोंडे, श्याम भोपले, मुन्ना मिरसाहेब, पुरुषोत्तम गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. तळेगावात पोलीस बंदोबस्त तळेगाव बाजार येथे बुधवारी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अकोला येथील दंगा काबू पथक, आकोट आणि तेल्हारा येथून पोलिसांची जादा कुमक बोलाविण्यात आली होती. यावेळी ठाणेदार जितेंद्र सोनवणे, उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 'Those' young farmer-death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.