काटेरी झुडुपे देतात अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST2021-02-23T04:28:21+5:302021-02-23T04:28:21+5:30

--------------------------------------------- वाडेगावात आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य! रस्त्यावर साचले डबके: ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या ...

Thorny shrubs invite accidents | काटेरी झुडुपे देतात अपघाताला निमंत्रण

काटेरी झुडुपे देतात अपघाताला निमंत्रण

---------------------------------------------

वाडेगावात आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य!

रस्त्यावर साचले डबके: ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या आठवडी बाजारसह अनेक प्रभागांमधील नाल्या तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील गटारे नाल्या तुडुंब भरल्या आहेत. परिणामी, यामधील सांडपाणी रस्त्यावर येते आहे. त्याच रस्तावर लहान मुले, वृद्धांची ये-जा सुरू असते, तसेच घाणीमध्ये वराहांचा वावर वाढला आहे. घाणीमुळे दुर्गंधी होऊन डासांची उत्पत्ती होत आहे. या दुर्गंधी व डासांना ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या घाणीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासन अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन नाल्यांची साफसफाई करावी, तसेच गावात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

---------------------------

आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावून आठवडी बाजारात स्वच्छता मोहीम राबवावी.

-शेख सलीम शेख रहुल्ला, वाडेगाव

Web Title: Thorny shrubs invite accidents