तेल्हा-यात ‘बर्निंंग कार’चा थरार!

By Admin | Updated: March 15, 2016 02:35 IST2016-03-15T02:29:45+5:302016-03-15T02:35:58+5:30

ऑटोरिक्षा,बसला धडक, नंतर उडाला भडका: चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

Thirty-three 'Burning Cars' in Telha | तेल्हा-यात ‘बर्निंंग कार’चा थरार!

तेल्हा-यात ‘बर्निंंग कार’चा थरार!

तेल्हारा (जि. अकोला): शहरातील मुख्य मार्गाने जाणार्‍या भरधाव इंडिका कारने आधी ऑटोरिक्षाला उडविले व नंतर बसला धडक दिली. त्यानंतर या कारचा भडका उडाला. एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटात शोभावा असा थरारक प्रसंग सोमवार, १४ मार्च रोजी तेल्हारा येथील नागरिकांनी अनुभवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. कार बेदरकार चालविणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अकोला येथून सागर पांडुरंग सरप (२४), शशी गजानन भागवत (२६), दीपक सुखदेव राऊत (२४) व सिद्धार्थ अशोक बोरकर असे चौघे युवक सोमवारी एम.एच. २३ ई. ८३७६ क्रमांकाच्या इंडिका कारने तेल्हारा शहरात आले. काम आटोपल्यानंतर कारने अकोल्याकडे परत निघाले. यावेळी इंडिकाचालक कमाल वेगात कार चालवत होता. साई गणेश संकुलाजवळ अनियंत्रित कारने एम.एच. २७ एच. ४४४७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाला धडक दिली. यामध्ये ऑटोरिक्षाचे नुकसान झाले. त्यानंतर इंडिका कार तशीच भरधाव अकोल्याच्या दिशेने निघाली. शहराबाहेर येताच सदर कारने गोपाळराव खेडकर महाविद्यालयासमोर उभ्या असलेल्या तेल्हारा आगाराच्या एम.एच. ४0 एन. ८२८५ क्रमांकाच्या बसला जोरदार धडक दिली.
धडक एवढी जबरदस्त होती की, त्यामुळे इंडिका कारचे चारही दरवाजे ह्यलॉकह्ण झाले. तेथे उपस्थित नागरिकांनी चौघांना कसेबसे बाहेर काढले. त्यानंतर क्षणार्धात इंडिका कारने पेट घेतला. थोड्या वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली. ही घटना शहरात वार्‍यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाणेदार नंदकिशोर नागलकर, सहायक पोलीस निरीक्षक रामभाऊ भास्कर, भस्मे यांनीही घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले; परंतु अग्निशमन वाहन घटनास्थळी उशिरा पोहोचले. तोपर्यंंत इंडिका कार जळून खाक झाली होती.
बसचालक अनिल श्रीराम गावंडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी इंडिकाचालक शशी भागवत याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३३७,२७९ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Thirty-three 'Burning Cars' in Telha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.