शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 15:14 IST

भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

ठळक मुद्दे जगात दरवर्षी साधारणत: ६० लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो.हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.यंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना ‘तंबाखू व हृदयरोग’ ही आहे.

अकोला : तंबाखू सेवन हे जगातील अनेक आजार आणि मृत्यूचे मोठे कारण आहे. जगात दरवर्षी साधारणत: ६० लाख लोकांचा मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतो. हे असेच सुरु राहिले तर २०३० पर्यंत तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ८० लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.भारतात सध्या सुमारे २५ लाख कर्करुग्ण आहेत. त्यात दरवर्षी ७ लाख लोकांची भर पडते. पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील कर्करोग हे भिन्न स्वरूपाचे आहेत. पुरुषांची जीवनशैलीच मुळात घातक आहे. एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी आहे. धूम्रपानामुळे कर्करोग झालेले जगभरात आहेत. भारतात मात्र बिडी ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. खैनी आणि त्यासोबत चुना (घोटा) याची गोळी गाल आणि जबड्याच्या मध्ये किंवा जिभेखाली ठेवली जाते. त्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होऊन चिडचिडपणा, अस्वस्थपणा वाढतो, तंबाखूजन्य पदार्थ न मिळाल्यास बेचैनी वाढते. गरोदर मातावर विशेष परिणाम होऊन कमी दिवसाचे, कमी वजनाचे मूल जन्मते किंवा मृत्युमुखी पडते, तसेच लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते. सिगारेटच्या धुरामुळे लहान मुलांवर परिणाम होतो.धूम्रपान हे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारणयंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना ‘तंबाखू व हृदयरोग’ ही आहे. हृदयविकारासाठी कारणीभूत असणाºया दहा गोष्टींमध्ये धूम्रपानाचा (चेन स्मोकर) समावेश आहे. धूम्रपानावर नियंत्रण मिळविल्यास हृदयविकाराचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते, असे जर्नल आॅफ अमेरिकन कॉलेज आॅफ कार्डिओलॉजीच्या सप्टेंबर २००९ च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.नियंत्रणासाठी ‘कोटपा अ‍ॅक्ट’तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी ‘कोटपा अ‍ॅक्ट’ (तंबाखू नियंत्रण कायदा) २००३ तयार करण्यात आला. हा कायदा भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे नियमन करतो. यामध्ये १८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखू विकता येत नाही. शाळेपासून १०० मीटरच्या परिसरात पानटपरीला परवानगी नाही. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, अशी काही बंधने आहेत.तंबाखूयुक्त पदार्थाचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न बनला आहे. अशा घातक पदार्थांचे सेवन न करणे कधीही चांगले. यासाठी तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाची जाणीव जनतेला करून देणे गरजेचे आहे.-डॉ. राजेश रांदड, मुुख कर्करोग तज्ज्ञ, अकोला.व्यसने ही कायद्याच्या धाकाने सुटणे कठीण आहेत. त्यासाठी योग्य समुपदेशन आणि सकारात्मक कृतीची गरज आहे. त्या अनुषंगाने व्यसनाधीन माणसांची व्यसन सोडण्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीद्वारे तशी कृती होताना दिसत असेल तरच ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’ साजरा झाला, असे म्हणता येईल.डॉ. प्रीती कोगदे (कवळकर), जिल्हा सल्लागार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य